जळगाव प्रतिनिधी | नवीन शैक्षणिक वर्षास सुरु होत येत्या १३ जूनपासून शाळांना सुरुवात होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकही मुल शाळाबाह्य राहू नये, यासाठी पालकांनी काळजी घेत, मुलांना शाळेत पाठवावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
जागतिक पालक दिनानिमित्त बुधवारी कार्यक्रम झाला. यावेळी डाॅ. आशिया बाेलत हाेते. ते म्हणाले की, आपलं मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता आपल्या पाल्यांना शाळेत दाखल करावे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन तसेच विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण केली जात आहे.
हे पण वाचा :
तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या तरुणीची आत्महत्या
जळगाव पुन्हा हादरले ! दगडाने ठेचून तरुणाची हत्या
महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलवली टास्क फोर्सची बैठक
Breaking ! एक लाखाची लाच स्वीकारणारा पोलिस उपनिरीक्षक गजाआड
शाळाबाहेरची शाळा, शाळा बंद पण शिक्षण सुरु, व्ही स्कूल अॅप, गल्ली मित्र, एक गाव एक बालरक्षक, मिशन शिक्षण हमी पत्रक, पालक संपर्क अभियान असे विविध उपक्रम शिक्षण विभागाने राबवून विद्यार्थ्याचे शाळेशी नाते टिकवून ठेवलेले आहे व यापुढे हे नाते अधिक घट्ट केले जाणार आहे. शाळापूर्व तयारीसाठी पहिला शाळास्तर मेळावा १८ एप्रिल रोजी झाला. यात पहिलीच्या वर्गासाठी २९ हजार ३४७ विद्यार्थी पात्र ठरली. यासह शाळेसाठी विद्यार्थी संख्या वाढवण्यावर भर देण्यात आला. दुसरा मेळावा १५ जून रोजी होणार आहे. आपलं मूल हे शिकल पाहिजे असे प्रत्येक पालकांना वाटते. त्यामुळे मुलांना शाळेत दाखल करावे व पालक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण करावी असेही आवाहन देखील डाॅ. आशिया यांनी केले.