मुंबई : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने विविध ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तसेच कोकणातील काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाचा पाऊस झाला. दरम्यान, आज (ता. 02) कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मागच्या 24 तासांमध्ये वर्धा येथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामानामुळे राज्यात ढगाळ वातावरण होत असून, उकाड्यात वाढ झाली आहे. रत्नागिरी, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत काही ठिकाणी, तर नाशिक, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.
हे पण वाचा :
सरकारच्या या निर्णयामुळे मद्यप्रेमींची गैरसोय होण्याची शक्यता, काय आहे जाणून घ्या?
जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ ! ATM फोडून 9 ऐवज लांबवला
धक्कादायक ! पाचोऱ्यात 80 वर्षीय वृद्धेचा विळ्याने गळा चिरला
धुळ्यातील एलआयसी एजंटच्या घरावर पोलिसांची छापेमारी, घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड
उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून पूर्व बांगलादेशपर्यंत पूर्व-पश्चिम हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असून, आज (ता.02) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुजरातच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. उद्यापर्यंत (ता. ३) मध्य अरबी समुद्र कर्नाटक, तमिळनाडूचा आणखी व भागासह कोकण, गोव्याच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.