मुंबई : मद्यप्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारने घरपोच मद्यविक्रीसाठी परवानगी दिली होती. दरम्यान, आता ही बंद होणार आहे. राज्य सरकारने उत्पादन शुल्क विभागाला मद्याची होम डिलिव्हरी थांबवण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.
गृहखात्याने उत्पादन शुल्क विभागाला मद्यविक्रीची पूर्वीची व्यवस्था पुन्हा अंमलात आणण्यास सांगितल्याची माहिती आहे. कोरोना काळातील निर्बंध उठवण्यात आल्यामुळे घरपोच मद्यविक्रीसाठी देण्यात आलेली होम डिलिव्हरीची परवानगीही आपोआपच रद्द होईल, असे गृहखात्याने उत्पादन शुल्क विभागाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. आता ही सेवा बंद झाल्यास मद्यप्रेमींची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :
जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ ! ATM फोडून 9 ऐवज लांबवला
धुळ्यातील एलआयसी एजंटच्या घरावर पोलिसांची छापेमारी, घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड
एकनाथ खडसेंसह इतर चौघांना ED ची नोटीस ; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
मी जर ती सीडी बाहेर काढली तर..; धनंजय मुडेंबाबत करुणा शर्माचे खळबळजनक वक्तव्य
उत्पादन शुक्ल विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राज्य सरकार या सगळ्याचे कायदेशीर आणि सामाजिक पैलू लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेईल. तोपर्यंत मद्याच्या होम डिलिव्हरीची सेवा सुरू राहील. करोना काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, या उद्देशाने मद्य घरपोच पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर अनेकांनी दुकानात जाऊन दारू खरेदी करण्यापेक्षा होम डिलिव्हरीचा पर्याय निवडला होता. तेव्हापासून मद्याच्या होम डिलिव्हरीचे प्रमाण वाढले होते. आता ही सेवा बंद होण्याची शक्यता आहे.