धुळे : धुळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने शहरातील अवैध खाजगी सावकारी करणाऱ्यां विरोधात धडक कारवाई केली आहे. त्याच दरम्यान धुळे शहरातील एलआयसी किंग अशी ओळख असलेल्या राजेंद्र बंब या एलआयसी एजंटच्या घरावर आर्थिक गुन्हा शाखेसह अन्य पोलिसांच्या पाच पथकांनी छापेमारी केली. यात पोलिसांना राजेंद्र बंब आणि त्यांच्या कुटूंबियांकडे मोठे घबाड सापडले आहे.
राजेंद्र बंब आणि त्यांच्या भावाकडून पोलिसांनी 1 कोटी 42 लाख 19 हजार 550 रुपयांची रोकड जप्त केली आहे. तर 46 लाख 22 हजार 378 रुपयांचें दागिने जप्त करण्यात आले आहेत. यासह कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेचे कागदपत्रांची पोलिसांना सापडले आहेत.
राजेंद्र बंब याच्याकडून 38 कोरे धनादेश, 104 खरेदी खत, 13 कोरे मुद्रांक आणि 204 मुदत ठेवीच्या पावत्या सापडले. तब्बल दहा तासांपेक्षा अधिक वेळ झळती नंतर हे घबाड समोर आले आहे. हे घबाड पाहून आणि त्याचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले आहेत.