पुणे : आपण आपल्या मुलांना काय शिकवतो? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण, यामुळेच पुण्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. इथं एका ८ वर्षीय मुलीने बाहुली आपल्याला सोडून गेली या विचारात असं काही केलं की घटना वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
पुण्यातील थेरगाव येथे आठ वर्षाच्या मुलीने घरात खेळत असताना बाहुलीला फाशी दिली आणि बहुलीचा जीव गेला असल्याचा समज करून त्याने स्वतः देखील गळफास घेतला. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला. कमल खेम साउद (वय 8, रा. सोळा नंबर बस स्टॉप, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कमल रविवारी त्याच्या खोलीत बाहुलीशी खेळत होती. त्यावेळी त्याची आई घरात काम करत होती, तर वडील बाहेर गेले होते. कमलने बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून तिला फाशी दिले. बाहुली आपल्याला सोडून गेल्याचा समज झाल्याने त्याने घरातील खिडकीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. कमलच्या आईने काम करत असताना त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो बाहुलीसोबत खेळत होता. काही वेळाने आईने पाहिले असता कमल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
हे पण वाचा :
सोनिया आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस, ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावले
तुमच्या कमाईशी संबंधित ‘हे’ 5 नियम आजपासून बदलणार, जाणून घ्या काय आहेत
खुशखबर.. LPG गॅस सिलेंडर १३५ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन दर
महाराष्ट्रात दुसरा कुणी नेता नव्हता का? काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
आईने कमलकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. वाकड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. एखाद्या कैद्याला ज्याप्रमाणे फाशी देतात त्या प्रमाणे बाहुलीच्या तोंडाला कापड गुंडाळले होते. कमल हॉरर फिल्म पाहत असे, त्यातूनच त्याने हे कृत्य केले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.