जळगाव: भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करत भविष्यवाणी केली आहे. शिवसेनेने शॉर्ट टर्म विचार करून मुख्यमंत्रीपद मिळवले. पण यामुळे भविष्यात शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यापेक्षाही वाईट दिवस येतील, असा इशारा महाजन (Girish यांनी दिला. ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी गिरीश महाजन यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडले. संजय राऊत हे शिवसेनेचा भोंगा आहेत. दररोज सकाळी हा भोंगा वाजतो. ते कधीच राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्या प्रश्नांविषयी बोलत नाहीत, असे महाजन यांनी म्हटले. त्यामुळे आता या टीकेला शिवसेनेकडून कशाप्रकारे प्रत्यु्त्तर दिले जाईल, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
शिवसेनेने शॉर्ट टर्म विचार करुन मुख्यमंत्रीपद मिळवले असेल. मात्र, यावेळी त्यांनी दीर्घकालीन राजकीय समीकरणांचा विचार केलेला नाही. शिवसेनेची जनमानसातील प्रतिम दिवसेंदिवस घसरत आहे. शिवसेना सतत किरीट सोमय्या, राणा कुटुंबीय आणि ईडी याच विषयांवर बोलत असते. या सगळ्यामुळे भविष्यात शिवसेनेची अवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षाही वाईट होईल, असे महाजन यांनी म्हटले.
हे पण वाचा :
खुशखबर.. LPG गॅस सिलेंडर १३५ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन दर
महाराष्ट्रात दुसरा कुणी नेता नव्हता का? काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
बिअरप्रेमींसाठी वाईट बातमी, लवकरच किंमती आणखी वाढणार
मान्सून ‘या’ तारखेला धडकणार महाराष्ट्रात
तसेच गिरीश महाजन यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपचाच विजय होईल, असा दावा केला. भाजपने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. राज्यसभेची तिसरी जागा आम्ही हमखास जिंकणार आहोत. आमच्याकडे बहुमत आहे. आम्ही घोडेबाजार करणार नाही, असे महाजन यांनी सांगितले