मुंबई : राज्यात अनेक नेते असताना काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशातील ३४ वर्षीय इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यानंतर राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तसेच तरुण नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. याच नाराजीतून विदर्भातील महत्त्वाचे काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे देशमुखांनी राजीनामा पाठवला आहे.
“अनेक कर्तृत्ववान नेते असूनही पक्षाने येथील नेत्यांचा विचार केला नाही. मला राज्यसभेचं आश्वासन देऊनही पक्षाने ते पूर्ण केलं नाही”, अशी खंत आशिष देशमुख यांनी बोलून दाखवली. राज्यसभेवर पाठवायला महाराष्ट्रात दुसरा कुणी नेता नव्हता का? असा सवालही त्यांनी केला आहे.
हे पण वाचा :
बिअरप्रेमींसाठी वाईट बातमी, लवकरच किंमती आणखी वाढणार
मान्सून ‘या’ तारखेला धडकणार महाराष्ट्रात
संतापजनक! पोटच्या मुलीवर जन्मदात्या बापाने केला ११ वर्षे लैंगिक अत्याचार, नराधम बापाला अटक
नवऱ्यावरील राग अनावर! निर्दयी आईने ६ चिमुरड्यांना विहिरीमध्ये फेकले
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी इम्रान प्रतापगडी (उत्तर प्रदेश) यांना लादल्यामुळे देशमुखांनी पदाचा राजीनामा दिला. बाहेरचा उमेदवार लादल्याने पक्षवाढीच्या दृष्टीने फायदा होणार नाही. महाराष्ट्रातील सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे, अशी खंत व्यक्त करत आशिष देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलेला असला तरी मी पक्षाचा कट्टर कार्यकर्ता म्हणून मी पक्षाचं काम करणार असल्याचं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेची लॉटरी लागलेले इम्रान प्रतापगढी कोण?मोहम्मद इम्रान प्रतापगढी हे उर्दू भाषिक कवी आहेत. ते उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आहेत. भारत आणि जगाच्या इतर भागांतील मुस्लिम अनुभव आणि अस्मिता यांचे वर्णन करणार्या निषेधात्मक काव्यासाठी इम्रान प्रतापगढी ओळखले जातात. ते विशेषतः “मदरसा” आणि “हाँ मै कश्मीर हूं” या उर्दू नझ्मसाठी लोकप्रिय आहेत.