पुणे : मान्सूनने सध्या अरबी समुद्राचा मध्य भाग, केरळ, तामिळनाडू आमि कर्नाटकचा काही भाग व्यापला आहे. दक्षिणसह बंगालच्या उपसागरातून मान्सून आता वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं प्रवास करत आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत मान्सून केरळचा उर्वरीत भाग, दक्षिण अरबी समुद्र, तामिळनाडू आणि कर्नाटकचा आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता आहे. हा प्रवास जर वेगानं झाला तर 6 जूनला मान्सून महाराष्ट्रात धडक देईल, असे सांगितले जात आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या 6 जून ते 10 जूनच्या दरम्यान राज्यात मान्सूनच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. आज देखील राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत विदर्भासह मराठवाड्यात पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे पण वाचा :
संतापजनक! पोटच्या मुलीवर जन्मदात्या बापाने केला ११ वर्षे लैंगिक अत्याचार, नराधम बापाला अटक
नवऱ्यावरील राग अनावर! निर्दयी आईने ६ चिमुरड्यांना विहिरीमध्ये फेकले
सर्वांसाठीच खुशखबर! मान्सून अखेर केरळमध्ये दाखल, पुढील आठवड्यात महाराष्ट्र्रात धडकणार
मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह येत्या 24 तासांत मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर येत्या 2 जून ते 3 जून रोजी कोकण आणि गोव्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मान्सूनने अरबी समुद्राचा मध्य भाग, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकचा काही भाग व्यापला आहे.
दरम्यान, येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून केरळचा उर्वरीत भाग, दक्षिण अरबी समुद्र, तामिळनाडू आणि कर्नाटकचा आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता आहे. तर येत्या दोन दिवसांत गोव्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.