- मस्कावद, कोचूर परिसरात प्रचार रॅली – नाथाभाऊंचा विकासरथ पुढे नेण्याचा निर्धार
मुक्ताईनगर – भाजपा, शिवसेना, रासप, रिपाई, रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीच्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या उमेदवार अॅड.रोहिणी एकनाथराव खडसे यांनी आज (दि.13) रावेर तालुक्यातील कोचूर खु॥, कोचूर बु॥, वाघोदा बु॥, सिंगनूर, आंदलवाडी, मस्कावद खु॥, मस्कावद बु॥, मस्कावद सिम परिसरात प्रचार रॅली काढून मतदारांचे आशिर्वाद घेतले. यावेळी प्रत्येक गावात त्यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी प्रचार रॅली मध्ये भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख शिवाजी पाटील,जि प उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,जि प सदस्य कैलास सरोदे, नंदाताई पाटील, रंजना ताई पाटील, उपसभापती अनिता ताई चौधरी,प स सदस्य योगीता ताई वानखेडे, श्रीकांत महाजन, महेश चौधरी, शुभम पाटीलपितांबर पाटील, रवींद्र महाजन, संतोष वाघ स्वाती परदेशी,संजय माळी, राहुल पाटील,कुंदन तायडे, विशाल पाटील, नितीन महाजन, राहुल महाजन,दिलीप सपकाळे, योगेश कोळी, कुंदन महाजन,नितीन भोगे,संजय भारंबे, शोभाताई इंगळे, सरला ताई वारके उपस्थित होते.
यावेळी विविध ठिकाणी बोलताना अॅड.रोहिणी एकनाथराव खडसे म्हणाल्या की, आ.एकनाथराव खडसे यांनी ज्याप्रमाणे विकास कामे केली, तोच विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील. त्यात कुठेही खंड पडू देणार नाही. या परिसरातील केळी उत्पादकांच्या आर्थिक उन्नत्तीसाठी भविष्यात केळीवर आधारित प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी व केळी निर्यातीसाठी लागणार्या सुविधा या परिसरातच उपलब्ध होण्यासाठी मी प्रयत्न करणार असून, आपल्या परिसराच्या विकासासाठी मला बहुमताने निवडून द्या.
बाजार समितीचे श्रीकांत महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी गेल्या तीस वर्षांपासून या मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केला आहे. प्रत्येक गावात रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा यासारख्या मुलभूत सुविधांसाठी कोट्यावधीचा निधी आणून विकास केला आहे. या भागातील प्रमुख पीक असलेल्या केळीला नैसर्गिक आपत्तीमध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पाठपुरावा करून निकषात बदल केले. त्याचा फायदा या परिसरातील शेतकर्यांना होऊन त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळाली. रोहिणीताईंना विजयी करून तीस वर्षे आपल्यासाठी अहोरात्र कष्ट करणार्या नाथाभाऊंचे हात बळकट करूया असे आवाहन केले. विधानसभा क्षेत्रप्रमुख शिवाजी पाटील यांनी प्रचार रॅलीदरम्यान मतदारांना आवाहन करताना सांगितले की, आपला भाग मुक्ताईनगर मतदारसंघात समाविष्ट झाल्यानंतर नाथाभाऊ व खा.रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून भरीव विकास कामे झाली आहेत. यावेळी पक्षाने रोहिणीताईंना उमेदवारी दिली आहे. रोहिणीताई नाथाभाऊंचा विकासाचा वारसा समर्थपणे पुढे नेतील, त्यासाठी त्यांना बहुमताने विजयी करा. प्रचार रॅलीमध्ये भाजपा, शिवसेना, रासप, रिपाई, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.