मुंबई : राज्यातील काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली. मात्र काही दिवसापासून बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. अशातच कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA4 आणि BA5चे 7 रुग्ण पुण्यात आढळून आल्यामुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.तसेच यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून जनतेला याविषयी सांगितले जाईल, असे ही अजित पवार यांनी केले आहे.
काय आहे कोरोनाचा नवा व्हेरिएंट?
पुण्यात ओमायक्रॉनचे 2 नवे सब व्हेरिएंट BA4चे चार आणि BA5चे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यात 4 पुरूष आणि 3 महिलांचा समावेश आहे. त्यातील चार रुग्ण हे 50पेक्षा जास्त वय असलेले, 2 रुग्ण 20 ते 40 मधील, तर एक रुग्ण हा 10 वर्षाखालील असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या BA 2 या व्हेरिएंटप्रमाणेच BA4 आणि BA5 व्हेरिएंटची लक्षणे आहे.
हे पण वाचा :
दिशा पटानीचा किलर लूक पाहून चाहते घायाळ !
महाराष्ट्र हरला ! अंघोळ करताना अल्पवयीन मुलीला बाथरूम मधून फरपटत शेतात नेत केला बलात्कार
या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण तामिळनाडू तर दुसरा रुग्ण तेलंगाणात आढळला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील पुण्यात 7 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या व्हेरिएंटपासून सुरक्षित राहण्यासाठी कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज असल्याचे इंडियन सार्स कोव्ह – 2 जिनोमिक्स कंसोर्टियमने म्हटले आहे.