जयपूर : हनी ट्रॅप प्रकरणात अटक करण्यात आलेला भारतीय लष्कराचा जवान प्रदीप कुमारच्या मोबाईलमधून धक्कादायक खुलासे झाले आहेत. गुप्तचर विभागाच्या तपासात हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या मुलीचे अनेक फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. भारतीय जवानाला हनी ट्रॅपमध्ये अडकवणारी मुलगी पाकिस्तानची असून तिथली गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करते. ही तरुणी भारतीय लष्कराच्या जवानांना बॉलीवूडच्या थीमवर रील बनवून पाठवायची.
हा लष्करी शिपाई राजस्थानमधील जोधपूर येथे तैनात होता. प्रदीप कुमार असे या जवानाचे नाव आहे. तो उत्तराखंडचा रहिवासी आहे. मोबाईलमध्ये सापडलेल्या हनी गर्लच्या फोटो आणि व्हिडिओंवरून याला दुजोरा मिळाला आहे. ही मुलगी इंस्टाग्रामवर कधी रिया शर्मा, कधी लीना शर्मा तर कधी हरलीन कौरच्या भूमिकेत सक्रिय होती.
हे पण वाचा :
हवामान विभागाकडून केरळमधील मान्सूनच्या आगमनाची नवी डेटलाइन, ‘या’ तारखेला धडकणार
भुसावळ-बोईसर बसचा भीषण अपघात, बस 25 फूट खोल दरीत कोसळली
वीज कोसळण्याबाबत दामिनी ॲप देणार माहिती, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले हे आवाहन
फेसबुकद्वारे झाली मैत्री, नंतर तरुणीला हॉटेलमध्ये बोलावले, मग् पुढे जे झालं ते धक्कादायकच
‘आईला मारू नको ना बाबा….!’ नराधम पित्याला विनवणी करणाऱ्या चिमुकलीचा Video व्हायरल
असे व्हिडिओ मोबाईलमधून जप्त केले
ही तरुणी वेगवेगळ्या नावाने अनेक सैनिकांना वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाठवत असे, असेही गुप्तचर तपासातून समोर आले आहे. जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये ती कधी अंघोळ करताना तर कधी गाताना व्हिडिओ जवानाला पाठवत असे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने तरुणाशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय दर महिन्याला भेटण्याचे आश्वासन दिले. तरुणीने जवानाला दिल्लीत भेटण्यासाठी बोलावलेही होते.
असे खुलले रहस्य
त्याच महिन्यात गुप्तचर विभागाला माहिती मिळाली होती की जवान प्रदीप कुमार सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी महिला एजंटच्या सतत संपर्कात आहे आणि सामरिक माहिती शेअर करत आहे. यानंतर १८ मे रोजी जवानाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली.
चौकशीदरम्यान जवानाने एकामागून एक अनेक खुलासे केले. राजस्थान इंटेलिजन्सचे डीजी उमेश मिश्रा यांनी सांगितले की, प्रदीप कुमारचे वय सुमारे २४ वर्षे आहे. तो उत्तराखंडच्या कृष्णा नगर गंगा कालव्याचा रहिवासी आहे. 3 वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात भरती झाला होता.