पुणे : अरबी समुद्रात तब्बल सहा दिवसांपुर्वी दाखल झालेला मान्सून श्रीलकेजवळ खोळंबला आहे. दरम्यान, मान्सूनची वाटचाल पुढे सुरू झाली असून मॉन्सूनचे केरळातील आगमन आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे.
यंदा मॉन्सून २७ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविली होती. केरळातील आगमनात चार दिवसांची विलंब होण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात मान्सून पुढच्या चार दिवसात येतो परंतु मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
यंदा नेहमीपेक्षा मान्सून लवकर येणार असे हवामान खात्याकडून सांगण्यात येत होते परंतु नैऋत्य मोसमी वाऱ्याचा वेग मंदावल्याने मान्सूनची वाटचाल संथ गतीने सुरू होती. मान्सून अरबी समुद्रात सहा दिवसांपुर्वी दाखल झाल्यानंतर श्रीलकेजवळ थांबला होता. दरम्यान मान्सूनची वाटचाल पुढे सुरू झाली आहे.
हे पण वाचा :
भुसावळ-बोईसर बसचा भीषण अपघात, बस 25 फूट खोल दरीत कोसळली
वीज कोसळण्याबाबत दामिनी ॲप देणार माहिती, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले हे आवाहन
फेसबुकद्वारे झाली मैत्री, नंतर तरुणीला हॉटेलमध्ये बोलावले, मग् पुढे जे झालं ते धक्कादायकच
‘आईला मारू नको ना बाबा….!’ नराधम पित्याला विनवणी करणाऱ्या चिमुकलीचा Video व्हायरल
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये भांडण, प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल!
मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने शनिवारपर्यंत (ता. २८) दक्षिण अरबी समुद्र, संपुर्ण मालदीव, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरीन समुद्राच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच मॉन्सूनच्या केरळातील आगमनाचेही हवामान विभागाकडून निरीक्षण सुरू आहे.