मुंबई : कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थ नियंत्रण कक्ष अर्थात एनसीबीकडून क्लीनचीट देण्यात आली आहे. एनसीबीकडून शुक्रवारी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये एनसीबीकडून आर्यनला क्लीनचीट देण्यात आली.
आर्यन खानला कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज नव्हते, असे एनसीबीने म्हटले आहे. या आरोपपत्रात एनसीबीने एनडीपीएस कायद्यातंर्गत एकूण १४ जणांवर ड्रग्ज सेवनाचा ठपका ठेवला होता. तर उर्वरित सहा जणांवरील आरोप पुराव्यांअभावी मागे घेण्यात आले आहेत. एनसीबीने कॉर्डिलिया क्रुझवर धाड टाकली तेव्हा आर्यन खान, मोहक यांना वगळून आरोपी असणाऱ्या सर्व व्यक्तींकडे ड्रग्ज सापडले होते, अशी माहिती एनसीबीचे अधिकारी संजय कुमार यांनी दिली.
हे पण वाचा :
फेसबुकद्वारे झाली मैत्री, नंतर तरुणीला हॉटेलमध्ये बोलावले, मग् पुढे जे झालं ते धक्कादायकच
‘आईला मारू नको ना बाबा….!’ नराधम पित्याला विनवणी करणाऱ्या चिमुकलीचा Video व्हायरल
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये भांडण, प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल!