नवी दिल्ली : राजस्थानमधील जोधपूर येथील एका तरुणीवर तिच्या मित्राने आणि दुसऱ्याने लग्नाच्या बहाण्याने सामूहिक बलात्कार केला. त्यात मुलगी गरोदर राहिल्यानंतर नराधमाने तरुणीचा गर्भपातही करून घेतला. याबाबत मुलीने तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
उदयमंदिर पोलिस स्टेशन परिसरातील २४ वर्षीय तरुणीची जयपूरच्या रवींद्र सिंहसोबत २५ नोव्हेंबर २०२१ रोजी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. यानंतर दोघांमधील जवळीक वाढू लागली. रवींद्र सिंगने तरुणीला सांगितले की, लवकरच लग्न करणार आहे. रवींद्र सिंहने गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी मुलीला राय का बाग भागातील एका हॉटेलमध्ये नेले आणि तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलगी गरोदर राहिली. यानंतर रवींद्र सिंगने तिचा गर्भपातही करून घेतला.
हे पण वाचा :
‘आईला मारू नको ना बाबा….!’ नराधम पित्याला विनवणी करणाऱ्या चिमुकलीचा Video व्हायरल
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये भांडण, प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल!
जळगावात MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने उचलले टोकाचं पाऊल, बहिणीच्या घरात घेतला गळफास
टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे आता जळगावमध्ये, अॅड. विजय दर्जीला अटक
22 मे रोजी रवींद्र सिंह जोधपूरला पोहोचला आणि तरुणीला हॉटेलमध्ये बोलावले. रवींद्रचा एक मित्रही होता. रवींद्र आणि त्याच्या मित्राने मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि तिला मारहाणही केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मुलीने कुटुंबीयांना दिली. यानंतर आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मुलीचे मेडिकल केले आहे. पोलीस आरोपींवर कारवाई करत आहेत.
जोधपूर पोलीस आयुक्तालयाचे एडीसीपी निशांत भारद्वाज या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी सांगितले की, पीडितेने तक्रार दाखल केली आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्याने तरुणाशी मैत्री केली होती. मैत्रीनंतर तो मुलगा जोधपूरला आला. लग्नाच्या बहाण्याने वन राय का बाग हॉटेलमध्ये पीडितेवर बलात्कार केला. रॅडिसन हॉटेलमध्येही लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेचे मेडिकल करण्यात आले आहे.लाइव्ह टीव्ही