मुंबई | येत्या १० जूनला राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. “शिवसेनेच्या वतीने मला पक्ष प्रवेशाची अट घातली होती. मात्र, मी ती नाकारली. मला शंका होती कि यात नक्कीच काही तरी घोडेबाजारी होणार. ती होऊ नये म्हणू मी हि निवडणूक लढवणार नाही. पण माझा हा माघार नाही हा माझा स्वाभिमान आहे. मी स्वराज्यसाठी यापुढे काम करणार आहे. माझ्यासाठी खासदारकीपेक्षा जनता म्हत्वाचाही आहे, अशी घोषणा संभाजीराजेंनी आज गेली.
संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगू इच्छितो कि ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्या ठिकाणी पुतळा आहे. त्या ठिकाणी आपण दोघांनी जाऊ आणि त्या ठिकाणी बोलायचे. मी खोटं बोलत नाही. मागील काही दिवसापूर्वी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली.
हे पण वाचा :
‘आईला मारू नको ना बाबा….!’ नराधम पित्याला विनवणी करणाऱ्या चिमुकलीचा Video व्हायरल
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये भांडण, प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल!
जळगावात MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने उचलले टोकाचं पाऊल, बहिणीच्या घरात घेतला गळफास
टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे आता जळगावमध्ये, अॅड. विजय दर्जीला अटक
मुख्यमंत्र्यानी त्यांचे दोन खासदार माझ्याकडे पाठवले. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी माझ्याशी फोनद्वाराने बोलत भेटण्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर मी त्यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत मला त्यांनी शिवसेना प्रवेशाची ऑफर दिली. मात्र मी ती त्याच क्षणी मला नाकारली. त्यावेळी मी त्यांना महा विकास आघाडीच्यावतीने अपक्ष म्हणून पुरस्कृत म्हणून उमेदवारी द्या अशी मी मागणी केली. मात्र, मुख्यमंत्र्यानी आपला दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे आता मी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु माझी हि माघार नसून आता मी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्र पिजून काढणार आहे.