- सकाळी 10 वाजता जाहीर सभा : मोदींना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी उसळणार

जळगाव (प्रतिनिधी) विधानसभा निवडणूक प्रचारा निमित्त आज दि. 13 रोजी सकाळी 10 वाजता जळगाव येथील विमानतळ समोरील मैदानावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रचंड जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपा, शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभे करिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रात जळगाव येथे पहिलीच सभा घेत असून ते काय बोलतात याची उत्सुकता आहे. त्यांच्या समवेत यावेळी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष तथा महसूल मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्यासह अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित राहणार आहे.