जळगाव : राज्यभरात गाजलेल्या टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे जळगावात असल्याचे स्पष्ट झाले असून पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी जळगावातून एका वकिलाला अटक केली आहे. अॅड. विजय दर्जी असे अटक केलेल्या वकीलाचे नाव आहे. दर्जी हे विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य असून बालाजी प्लेसमेंट नावाने गोलाणी मार्केटमध्ये त्यांची शाखा आहे. यात सुशिक्षीत तरुणांना नोकरी देण्याचे काम ते करतात.
हे पण वाचा :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीय मंत्रांच्या घरावर ईडीची छापेमारी, राजकीय वर्तुळात खळबळ
रेस्टॉरंटला सरकारचा इशारा, ग्राहकांकडून जबरदस्तीने सर्व्हिस चार्ज वसूल करता येणार नाही
केसगळती नियंत्रित करण्यासाठी ‘हे’ आरोग्यदायी पदार्थ खा !
तरुणाच्या हत्येने जळगाव पुन्हा हादरले ! दगडाने ठेचून केली हत्या
या गुन्ह्याचा तपास पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. यात म्हाडा पेपरफुटीचे प्ररकणही समोर आले आहे. अॅड. दर्जी यांच्या बालाजी जॉब प्लेसमेंटच्या कार्यालयात बुधवारी सकाळी पुणे पोलिसांचे पथक आले. दर्जी यांच्या कार्यालयातील एक कर्मचाऱ्याची चौकशी काही महिन्यांपुर्वी झाली होती. यात अनेक पुरावे पोलिसांना मिळाले होते. त्यानुसार बुधवारी पथकाने चौकशीअंती दर्जी यांना अटक करुन पुण्याला चौकशीसाठी नेले आहे.