नवी दिल्ली : झारखंडमधील पाकूर जिल्ह्यात एका विद्यार्थिनीला मारहाण केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यापर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी ट्विटरवर उत्तर दिले आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पाकूर पोलिसांना दिले.
पाकूरमधील महेशपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रोलग्रामचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाळेच्या ड्रेसमध्ये एक तरुण एका मुलीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ रजनी मुर्मू नावाच्या ट्विटर हँडलने शेअर केला आहे.
व्हिडिओ शेअर करताना लिहिले होते की, “एक मुलगा एका आदिवासी मुलीला बेदम मारहाण करत आहे आणि दुसरा मुलगा तिचा व्हिडिओ बनवत आहे. पीडित मुलगी सेंट स्टॅनिस्लॉस एचएस हथिमारा शाळेची विद्यार्थिनी आहे आणि मुलगा रोलामारा गावचा रहिवासी आहे. आदिवासी महिलांवर सातत्याने अत्याचार होत असून, त्याचा व्हिडिओ समोर येत आहे.
एक लड़का एक आदिवासी लड़की को बुरी तरह से मार रहा है और दूसरे लड़के इसकी विडियो बना रहे हैं. लड़की St Stanislaus H S hathimara पाकुड़ में पढ़ती है और लड़का रोलामारा गाँव, महेशपुर ब्लॉक, पाकुड़ जिले का है. आदिवासी महिलाओं pr लगातार हिसंक विडियो होते हैं @Alamgircongress pic.twitter.com/sY97FrUBy2
— Rajni Murmu (@murmu_rajni) May 21, 2022
हा व्हिडिओ शेअर करताना रजनी मुर्मू यांनी झारखंडचे ग्रामीण विकास विभागाचे मंत्री आणि पाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आलमगीर आलम यांना त्यांच्या ट्विटमध्ये टॅग केले आहे.
व्हिडिओ समोर आल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी यावर नाराजी व्यक्त करत त्यांच्या ट्विटर हँडलवरून प्रतिक्रिया दिली आणि पाकूर डीसी, एसपी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. एवढेच नाही तर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कारवाई करून माहिती देण्याचे निर्देशही दिले आहेत.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत पाकूर डीसी आणि एसपी यांच्याकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.