नवी दिल्ली : वाढत्या खाद्यतेलांमुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमोडून गेलं आहे. मात्र, अशात काहीस दिलासा देणारी बातमी समोर आलीय. देशांतर्गत बाजारात सर्व खाद्यतेलाच्या (शेंगदाणे, सोयाबीन, मोहरी आणि पामोलिन) किंमती खाली येत आहेत. देशांतर्गत बाजारात अनेक खाद्यतेलाच्या किंमतीत प्रतिलिटर 7 ते 10 रुपयांनी घसरण झाली आहे. मात्र, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि, परदेशातील तेलाच्या किंमती अजूनही खाली आलेल्या नाहीत.
इंडोनेशियाने निर्यात पुन्हा सुरु केल्यामुळे ही घसरण झाली आहे असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. इंडोनेशियन सरकारने अलीकडेच 23 मे पासून पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याची घोषणा केली. यामुळे आता सोयाबीन आणि पामोलिन तेलाच्या किंमतीत जवळपास $100 ने घसरण झाली आहे. मात्र, सूर्यफूल तेलाच्या किंमती अजूनही वाढलेल्याच आहेत.
सध्याच्या काळात सतत वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चटका बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्चे तेल, गॅस आणि इतर वस्तूंच्या किंमती सातत्याने वाढतच आहेत.
किंमती का वाढल्या ?
गेल्या काही महिन्यांपासून परदेशातील खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतींमुळे आयात कमी झाली होती. मात्र, सोयाबीन, भुईमूग, कापूस आणि मोहरी या तेलांमुळे स्थानिक मागणी भागवली जात होती. दरम्यान, इंडोनेशियाने देखील सोयाबीन आणि पामोलिन तेलाच्या किंमती सुमारे $100 ने कमी केली. ज्यामुळे आता आयातही पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसांत इंडोनेशियातून तेलाची आयात झाल्यानंतर खाद्यतेलाच्या किंमती आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :
कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री टोपेंचे महत्वाचे विधान.. म्हणाले
खबरदार ! रेल्वेने प्रवास करताना ‘ही’ चूक केल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंडही आकारला जाईल
रेल्वेत नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी..10वी पाससाठी बंपर रिक्त जागा
जुळे असल्याचा फायदा भावाच्या पत्नीसोबत केले धक्कादायक कृत्य
धक्कादायक ! लग्नाचे आमिष देत तब्बल साडे सहा महिने केला अत्याचार, अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती
देशांतर्गत बाजारात मोहरीच्या तेलाची किंमत किती आहे ?
बाजारात सध्या मोहरीच्या तेलाचा दर 45 ते 50 रुपये प्रतिलिटर इतका कमी आहे. राजस्थान यूपी, बिहार आणि मध्य प्रदेश सारख्या मोठ्या राज्यांमध्ये देखील मोहरीच्या तेलाची किंमती प्रति लिटर 170 रुपयांच्या खाली आलेल्या आहेत.
तज्ञांचे काय मत आहे ?
येत्या काही दिवसांत देशात मोहरीच्या तेलाचा तुटवडा जाणवू शकेल. त्यामुळे खाद्यतेलाच्या पुरवठ्यातील अडचणी टाळण्यासाठी सरकारी खरेदी संस्थांनी मोहरीप्रमाणेच तेलबियांचा देखील साठा करावा. यासोबतच देशातील किरकोळ व्यवसायातील हेराफेरीला प्रत्येक राज्य सरकारने पायबंद घालावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.