आता इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेदच्या फॅशनचे काय? प्लॅस्टिकपासून ते सेफ्टी पिनपर्यंत, उर्फी जावेद सर्व गोष्टींमधून तिचे कपडे बनवून कहर करते. पण यावेळी उर्फीने परिधान केलेल्या ड्रेसबद्दल क्वचितच कोणी कल्पना करू शकेल.
तुम्ही विचार करत असाल की उर्फी नेहमीच विचित्र कपड्यांमध्ये दिसते, मग तिने आता नवीन काय परिधान केले आहे. तुम्ही आधी हा व्हिडिओ पहा, उर्फीचा ड्रेस पाहून तुम्हाला धक्का बसेल. होय, कारण यावेळी उर्फीने काचेच्या तुकड्यांपासून बनवलेला ड्रेस घालत कोट्यवधी चाहत्यांना घायाळ केलं.
हटके स्टाइलने लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फी जावेदने इन्स्टापेजवर ३ मिलियन्स फॉलोअर्स झाल्याबददल पार्टी दिली. या पार्टीत तिने घातलेल्या २० किलो वजनाच्या काचेच्या ड्रेसची चर्चा रंगली आहे. या पार्टीत मैत्रीण राखी सावंतसोबत उर्फीने धमाल केली. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.