मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, सोबतच महाराष्ट्रात देखील कोरोना डोकं वर काढत असून चौथी लाटेची कितपत शक्यता आहे, यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.तसेच राज्यात कालच्या दिवसात 326 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याच चौथी लाट येणार का यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान देशात ओमायक्रॉनच्या दुसरीकडे BA.5 चंही एक प्रकरण समोर आलं आहे. म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची चौथ्या लाटेची शक्यता असण्याची माहिती दिली आहे.
तसेच राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती गंभीर नाहीय. कारण राज्यात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा चांगला परिणाम दिसून येत आहे. पण कोरोनाच्या रूग्णांची नोंद होताना दिसतेय कारण लोकांची गर्दी वाढत असून, विविध मेळावे, राजकीय कार्यक्रम होत आहे. त्यात लोकं एकमेंकांना भेटत आहे. मात्र अपेक्षेप्रमाणे रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत नाहीय.
हे पण वाचा :
खबरदार ! रेल्वेने प्रवास करताना ‘ही’ चूक केल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंडही आकारला जाईल
रेल्वेत नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी..10वी पाससाठी बंपर रिक्त जागा
जुळे असल्याचा फायदा भावाच्या पत्नीसोबत केले धक्कादायक कृत्य
धक्कादायक ! लग्नाचे आमिष देत तब्बल साडे सहा महिने केला अत्याचार, अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती
त्यामुळे राजेश टोपे पुढे म्हणाले, कोरोनाच्या रूग्णांची नोंद पाहता काळजी करण्याचं कारण नसून कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं सांगितलं आहे.