मुंबई । संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या खासदारकीच्या निवडणुकी संदर्भात घोषणा केल्यानंतर त्यांना शिवसेनेत घेण्याकडे हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान काल शिवसेनेच्या शिष्टमंडळाने संभाजीराजेंच्या भेट घेतली तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना उद्या शिवबंधन बांधण्यासाठी वर्षावर 12 वाजता या, असे फोन करून सांगितले. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना प्रवेशाची अट संभाजीराजेंना घालण्यात आली असल्याने आहे. मात्र, त्यांनी ती मान्य न करता मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाकडे व शिवसेनेच्या प्रस्तावाकडे पाठ फिरवली असून ते थेट कोल्हापूरकडे रवाना झाले आहे.
संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधण्यासाठी आमंत्रित केल्यामुळे संभाजीराजे काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या निमंत्रण पाठ फिरवली असून ते शिवसेनेत प्रवेश करणार नसल्याचे दिसून येत आहेत.
हे पण वाचा :
राज्याच्या व्हॅट कपातीनंतर आज पेट्रोल डिझेल मिळतंय इतक्या रुपयाला
राज्यातील जनतेसाठी खुशखबर.. राज्य सरकारकडून पेट्रोल-डिझेल इतक्या रुपयांनी स्वस्त
धक्कादायक ! लग्नाचे आमिष देत तब्बल साडे सहा महिने केला अत्याचार, अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे या पदांसाठी भरती, वेतन ७५०००
भारतीयांच्या लग्नाआधी आणि बाहेरच्या लैंगिक संबंधाबद्दल धक्कादायक सरकारी अहवाल समोर
काल मुख्यमंत्र्यांप्रमाणे शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंसोबत फोनवरुन चर्चा केली होती. तर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने देखील तब्बल तासभर संभाजीराजेंशी चरचा केली होती. मात्र, त्यांनी शिवबंधन न बांधण्याचा विचार करत थेट कोल्हापूर गाठले आहे. शिवसेनेची ही ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे.