जळगाव : महागाईचा चढता आलेख आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील तेजीने सरकारवरील दबाव वाढला आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्राने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करुन ग्राहकांना दिलासा दिला होता. त्यांनतर राज्य सरकारने देखील इंधन दरावरील व्हॅट कमी केला आहे. त्यामुळे आजपासून राज्यात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं आहे.
राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅट प्रतिलिटर २ रुपये ८ पैसे आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये १ रुपया ४४ पैशांची कपात केली आहे. तत्पूर्वी शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोलच्या उत्पादन शुल्काच्या दरात प्रतिलिटर ८ रुपयांनी, तर डिझेलच्या उत्पादन शुल्काच्या दरात प्रतिलिटर ६ रुपयांनी कपात केली होती.
हे पण वाचा :
घ्या आता.. करामती नवऱ्याने पत्नीच्या अल्पवयीन बहिणीलाच पळवून नेले ; सासरवाडीतील मंडळी हैराण
केंद्र आणि राज्य सरकारने व्हॅट घटवल्यावर आता जळगावमध्ये पेट्रोल ११० रु.५३ पैसे, तर डिझेल ९७.०३ वरून ९५.५९ रुपयावर आले आहे. तर मुंबईत आज सोमवारी एक लीटर पेट्रोलचा भाव १११.३५ रुपये इतका खाली आला आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये इतका झाला आहे. कोलकात्यात १०६.०३ रुपये आणि चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.६३ रुपये झाला आहे.