मुंबई : केंद्र सरकारने काल पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर कमी केल्यानंतर आता राज्य सरकारनेही सकारात्मक पाऊल उचललं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील करकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल.
राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.
मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.
हे पण वाचा :
धक्कादायक ! लग्नाचे आमिष देत तब्बल साडे सहा महिने केला अत्याचार, अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे या पदांसाठी भरती, वेतन ७५०००
भारतीयांच्या लग्नाआधी आणि बाहेरच्या लैंगिक संबंधाबद्दल धक्कादायक सरकारी अहवाल समोर
घ्या आता.. करामती नवऱ्याने पत्नीच्या अल्पवयीन बहिणीलाच पळवून नेले ; सासरवाडीतील मंडळी हैराण