पोलिसात भरती होण्याच्या तयारीत असलेल्या तरुण उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस विभाग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती असणार आहे.
पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.
एकूण जागा ; 505
पदाचे नाव : पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
{महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}
हे पण वाचा :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे या पदांसाठी भरती, वेतन ७५०००
नोकरीची मोठी संधी.. राज्य राखीव पोलिस बलात 105 जागांसाठी भरती
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! 641 जागांसाठी बंपर भरती
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.