मुंबई : कोरोनामध्ये कुटुंब प्रमुखाचा जीव गेला आणि घरामध्ये आर्थिक संकट निर्माण झाले. या संकटात आईसह दोन तरूणी मुलींनी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. दिल्लीतील वसंत विहार या तिहेरी आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. पोलिसांना घरातून सुसाईड नोट सापडली आहे. यातून आत्महत्येचा धोकादायक प्लॅन उघड झाला आहे.
आईसह दोन मुलींची आत्महत्या
दिल्लीच्या वसंत विहारमध्ये शनिवारी रात्री एकाच कुटुंबातील तीन महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. प्राथमिक तपासात तिघींचाही मृत्यू गुदमरल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या अंजू या आपल्या दोन मुली अंशिका आणि अंकूसोबत फ्लॅटमध्ये राहत होत्या. अंजू यांच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले होते. तेव्हापासून कुटुंबियांना आर्थिक चणचण निर्माण झाली होती आणि यामुळे आई आणि मुली डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या असे सांगितले जात आहे. यासंदर्भात डीसीपी म्हणाले की, शनिवारी रात्री नऊ वाजता पोलिसांना माहिती मिळाली की वसंत विहार येथील वसंत अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 207 आतून बंद आहे आणि आवाज देऊन किंवा दारावरची बेल वाजवूनही कोणीही आतून दरवाजा उघडत नाही.
हे पण वाचा :
भारतीयांच्या लग्नाआधी आणि बाहेरच्या लैंगिक संबंधाबद्दल धक्कादायक सरकारी अहवाल समोर
घ्या आता.. करामती नवऱ्याने पत्नीच्या अल्पवयीन बहिणीलाच पळवून नेले ; सासरवाडीतील मंडळी हैराण
सुवर्णसंधी.. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव येथे 105 जागांसाठी भरती, असा करा अर्ज
जामनेर तालुक्यातील तरुणाचा नकली नोटा छापण्याचा पराक्रम; प्रात्यक्षिक VIDEO पाहून पोलिसही चक्रावले
बायकोला प्रियकराच्या मिठीत पाहिलं, हताश पतीने सुसाईड नोट लिहून घेतला गळफास
मृत्यूपूर्वी भिंतीवर लिहिली नोट
दिल्ली पोलिस वसंत अपार्टमेंटमध्ये पोहचले असता. फ्लॅटची दरवाजे आणि खिडक्या संपूर्ण बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडला असताना फ्लॅटमधून धुराचे लोट बाहेर आले. आई आणि दोन्ही मुलींचे मृतदेह खोलीत पडले होते. कुटुंबीयांनी मृत्यूपूर्वी भिंतीवर चिठ्ठी चिकटवली होती, खोलीत प्रवेश केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा लायटर किंवा आग लावू नका. खोलीत गॅसमुळे दुर्घटना घडू नये आणि इतर कोणाचेही नुकसान होऊ नये. यासाठी या कुटुंबियांनी अशा प्रकारची चिठ्ठी भिंतीला चिटकून ठेवली होती. यासंदर्भात आजतकने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.