जळगाव,(प्रतिनिधी)- मल्हार हॉबी डुबी डू या आगळ्या वेगळ्या मंचातर्फे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मुलांना त्यांचे छंद विकसित करता यावे, नवं काही शिकता याव यासाठी रतनलाल सी बाफना ज्वेलर्सच्या सहकार्याने समर हॉबी फेस्ट चे मोफत आयोजन २८ मे ते ३ जून दरम्यान करण्यात आले आहे.फ्री समर हॉबी फेस्ट साठी नाव नोंदणी सुरु करण्यात आली असून रजिस्ट्रेशन साठी https://forms.gle/4waToi4mKrjVerZb9 या लिंक चा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हॉबी डुबी डू या मंचाद्वारे कलाक्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ञांची माहिती आपण जनतेपर्यंत दर शनिवारी सायंकाळी ६ वा. ऑनलाईन पोहचवीत असतो व आजपर्यंत ८० पेक्षा जास्त कलाकारांनी या मंचाला सुशोभित केले आहे.
या फेस्ट मध्ये ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग, ओरिगामी आर्ट, बॉलिवूड स्टाईल डान्स, संगीत व सायबर नॉलेज इ. विविध विषयांवर ऑनलाईन शिबीर घेण्यात येणार आहे. शिबीर हे ७ दिवसांचे असेल व यात शहरातील मान्यवर तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. फेस्टमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देण्यात येतील.
हॉबी फेस्टमध्ये नाव नोंदणीसाठी ८३१९८९०६४३, ९८३४८६०८६२ या मोबाईल क्रमांकावर अथवा मल्हार हॉबी डुबी डू या फेसबुक ग्रुपवर असल्येल्या या रजिस्ट्रेशन