औरंगाबाद,(प्रतिनिधी) – एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 21मे रोजी दुपारी घडली आहे.शहरातील देवगिरी महाविद्यालयाजवळ हा थरारक प्रकार घडल्याने घटनेने शहरात खळबळ उडाली आहे दरम्यान आरोपी फरार असून त्याच्या शोधार्थ पोलिसांचे तीन पथक असल्याची माहिती आहे.
बीबीएच्या प्रथम वर्गात शिक्षण घेणारी ग्रंथी सुखप्रीत कौर प्रीतपाल सिंग असे मृत झालेल्या विद्यार्थिनीचे नावं असून मृत विद्यार्थिनी आणि मारेकरी दोघेही औरंगाबाद शहरातील उस्मानपुऱ्यामधील रहिवाशी आहेत.
हे पण वाचा……
नोकरीची मोठी संधी.. राज्य राखीव पोलिस बलात 105 जागांसाठी भरती
तरुणांनो उठा तयारीला लागा ; राज्यात लवकरच सात हजार पदांसाठी पोलीस भरती
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! 641 जागांसाठी बंपर भरती
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
दोघं एका कॅफेत बसले होते…
मृत विद्यार्थिनी व मारेकरी एकमेकांच्या ओळखीचे होते. ते एका कॅफेत बसले होते तेथे त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे कॅफेचालकाने त्यांना बाहेर जाण्यास सांगितले, तेथून निघाल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला यानंतर मारेकऱ्याने त्याच्याजवळील शस्त्र काढले तेव्हा जीवाच्या आकांताने तरुणी पळु लागली. ती ओरडत असल्याने लोकही मागे पळत सुटली होती.मात्र त्याने तिला गाठून तिच्या गळा शस्त्राने कापला यातच तिचा मृत्यू झाला.सदर खून एकतर्फी प्रेमातून झाल्याची माहिती आहे.