मुंबई : उष्णतेच्या तडाख्याने हैराण झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे मान्सून अंदमानात दाखल झालेल्या मान्सूनचे 27 मे रोजी केरळमध्ये आगमन होण्याचा अंदाज आहे. तर सर्वांना उत्सुकता असलेला महाराष्ट्रातील मान्सून येत्या 5 जूनला तळकोकणात (Rain Update) दाखल होण्याची शक्यता आहे.
यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपल्या राज्यातील बहुतांश शेतकरी हे पावसावर अवलंबून असतात. अनेक ठिकाणी सध्या पिण्याच्या पाण्यासाठीही मोठी फरफट करावी लागत आहे. त्यामुळे मान्सून जेवढ्या लवकर येईल तेवढ्या लवकर बळीराजा सुखावणार आहे.
हे पण वाचा :
सावत्र आईवर मुलाचा जडला जीव, लग्नही केलं; नंतर वडिलांनी गाठले पोलीस स्टेशन
बायकोला प्रियकराच्या मिठीत पाहिलं, हताश पतीने सुसाईड नोट लिहून घेतला गळफास
सुप्रिया सुळे आणि रक्षा खडसे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
महागाईचा चटका ! गॅस सिलिंडर दरवाढीचा भडका, आज इतक्या रुपयांनी महागला
नेहमी मान्सून पाऊस 7 जूनच्या सुमारास राज्यात हजेरी लावतो. यावेळी पाऊस दोन दिवस अगोदरच राज्यात येणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळकर यांनी ही माहिती दिली आहे. ली नीना परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून, यावेळी राज्यात समाधानकारक पाऊस पडेल अशी माहितीही होसाळीकर यांनी यावेळी दिली आहे. मराठवाड्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. पाऊस तळकोकणात 5 जूनला दाखल झाला तरी त्यानंतर दोन तीन दिवसांत तो संपूर्ण राज्याला व्यापेल, असेही सांगण्यात आले आहे.