मुंबई : आज सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे मात्र, चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरात 4,100 रुपयांची वाढ झाली आहे.
गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,300 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 24 कॅरट सोन्याचा (Gold) भाव प्रति तोळा 50,510 रुपये एवढा आहे. बुधवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,100 इतके होते. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50,290 एवढा होता. याचाच अर्थ आज 22 कॅरट सोन्याच्या दरात तोळ्यामागे 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळा 220 रुपयांची वाढ झाली आहे.
तर दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी भाववाढ पहायला मिळत आहे. बुधवारी चांदीचे दर प्रति किलो 61,000 रुपये इतके होते. तर आज चांदीचा (silver) भाव प्रति किलो 65,100 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याचे दर हे दिवसातून दोनदा बदलतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू झाल्यानंतर तर दुसऱ्यांदा सायंकाळच्या वेळी त्यामुळे सोन्याच्या दरात अनेकदा तफावत आढळून येते.
हे पण वाचा :
सुप्रिया सुळे आणि रक्षा खडसे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
महागाईचा चटका ! गॅस सिलिंडर दरवाढीचा भडका, आज इतक्या रुपयांनी महागला
धक्कादायक : व्हिडिओ चॅट करत असतानाच ‘या’ साऊथ अभिनेत्रीने घेतला गळफास
ITI पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी, असा करा अर्ज
राज्यातील सोन्याचे भाव
आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,300 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,510 रुपये इतका आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,360 असून 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,570 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 व 24 कॅरट सोन्याचा दर अनुक्रमे 46,360 आणि 50,570 इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,360 तर 24 कॅरट सोन्याचा दर 50,570 इतका आहे. आज राज्यात चांदीचा दर प्रति किलो 65,100 इतका आहे.