जळगाव : जळगाव दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार रक्षा खडसे यांनी सदिच्छा भेट घेतली असून या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही भेट औपचारिक असल्याचे सांगितले जात असले तरी याबाबतचा फोटो खा. सुळे यांनी ट्वीट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दोन दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळे जळगावात होत्या. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे महागाईविरोधात आंदोलन झाले. यानंतर रात्री खा. सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी भेट दिली. याचवेळी एकनाथ खडसे यांच्या स्नुषा तथा भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी देखील त्यांची भेट घेतली.
यावेळी खा. खडसे यांनी सुप्रिया सुळे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी त्यांच्यात चर्चा झाली. सुप्रिया सुळे यांनी खडसे याच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीची ट्विट करून माहिती दिली व भेटीचे फोटोही शेअर केले. या फोटोमध्ये रक्षा खडसेसह मंदाकिनी खडसेही आहेत.
हे पण वाचा :
महागाईचा चटका ! गॅस सिलिंडर दरवाढीचा भडका, आज इतक्या रुपयांनी महागला
धक्कादायक : व्हिडिओ चॅट करत असतानाच ‘या’ साऊथ अभिनेत्रीने घेतला गळफास
ITI पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी, असा करा अर्ज
खा. सुळे व भाजप खासदार खडसे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान ही सदिच्छा भेट असल्याचे दोघींनीही स्पष्ट केलं आहे. आपल्या मतदारसंघात आल्याने त्यांचा सत्कार केल्याची माहिती रक्षा खडसे यांनी दिली असून, याकडे राजकीय दृष्टीकोनातून बघू नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.