नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून अनेक अभिनेत्रींच्या मृत्यूच्या बातम्या समोर येत आहेत. नुकतेच कन्नड अभिनेत्री चेतना राज हिचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला. आता आणखी एका दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची भागात राहणारी ट्रान्सवुमन मॉडेल तिच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मल्याळी अभिनेत्री शेरीन सेलिन मॅथ्यू तिच्या मैत्रिणीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती. 26 वर्षीय अभिनेत्री मित्रासोबत व्हिडिओ चॅट करत होती त्या मित्राने पोलिस अधिकाऱ्यांना शेरीनच्या हालचालीची माहिती दिली. मात्र पोलिस अधिकाऱ्यांना अभिनेत्रीला वाचवता आले नाही, कारण ती घरी पोहोचेपर्यंत शेरीनने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती.
हे पण वाचा :
सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.. आज ‘इतक्या’ रुपयाने झाले स्वस्त
संतापजनक ! कोल्ड्रिंक्स पाजून तीन जणांचा महिलेवर अनैसर्गिक अत्याचार
गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का ; हार्दिक पटेलने दिला राजीनामा, कारणही सांगितले?
सेक्स रॅकेटचा भांडाफोड ; चक्क पेन्शनर महिला चालवायची सेक्स रॅकेट
एअर होस्टेसचा डान्स पहिला का? Video पाहून फॅन व्हाल!
शेरीन डिप्रेशनशी झुंज देत होती
शेरीन सेलिन मॅथ्यूच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अभिनेत्रीच्या जवळच्या लोकांनी माहिती दिली की अभिनेत्री डिप्रेशनची शिकार होती. गेल्या काही दिवसांपासून ती खूप उदास वाटत होती. या घटनेसंदर्भात पोलीस शेरीनच्या जवळच्या मित्रांचे जबाब नोंदवत आहेत. तपास प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह कलामसेरी मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात येणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, शेरीनने काही मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि मॉडेलिंगच्या जगात ती खूप सक्रिय होती. कोचीमध्ये गेल्या वर्षभरात ट्रान्सजेंडरने केलेल्या आत्महत्येची ही पाचवी घटना आहे.