जामनेर,(प्रतिनिधी)- भजपा नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून भाजपा सोशल मीडिया तालुका उपाध्यक्ष निलेश शिसोदे यांच्यातर्फे जामनेर तालुक्यात आज 17 मे रोजी किरणा किट वाटप करण्यात आले.
भाजपा नेते गिरीश महाजन यांनी यापूर्वीच वाढदिवस साजरा करतांना वाढदिवस बॅनर वगैरे न लावता वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करावा अशा सूचना दिल्या होत्या.म्हणूनच निलेश सिसोदे यांनी गरजू लाभार्थी पर्यंत निराधार कुटुंबापर्यंत किराणा किट वाटप करून एक आदर्श निर्माण केला आहे. यावेळी युवा अध्यक्ष संग्राम शिसोदे, सुरेंद्र शिसोदे, करण बेलदार, विलास बेलदार, अंकित राजपूत व तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.