जळगाव : एकनाथ खडसेंनी घरीच बसावे असा टोला भाजप नेते गिरीश महाजनांनी लगावला होता. त्यावर आता उत्तर देताना एकनाथ खडसेंनी पुन्हा जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘शिवसेनेला बेडूक म्हणणार्या भाजप नेते गिरीश महाजन यांनी आधी स्वत: ला सुधारावे, त्यानंतर पक्षाला सुधारावे. गिरीश महाजन मला काय म्हणतील घरी बसा. गिरीश महाजन यांचीच घरी बसण्याची वेळ आता आली आहे’ असा टोला एकनाथ खडसे यांनी महाजन यांना लगावला आहे. भुसावळ येथील एका कार्यक्रमात एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना खडसे म्हणाले की, गिरीश महाजन आज पदावर आहेत. मी पदावर नसलो म्हणून काय झालं. मात्र, या खडसेंनीच तुम्हाला मोठं केलं. महाजनांना बोलताही येत नव्हतं. त्यामुळे लायकही मीच त्यांना घडवलं असल्याचेही खडसे म्हणाले. गेल्या काळातील जिल्हा बँक असो, विकास सोसायट्या असो की बोदवड नगर पंचायत निवडणुका असो, एकही निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळालेलं नाही. त्यामुळे जिल्ह्यात भाजपला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे ज्यांना मी मोठं केलं ते काय मला सल्ला देतील असा टोलाही खडसे यांनी महाजनांना लगावला.
हे पण वाचा :
सुवर्णसंधी..भारतीय सैन्यात 10वी पास उमेदवारांसाठी भरतीची मोठी घोषणा
रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट ; रेल्वेचा हा नवा नियम वाचा एकदा…
चहा पिणाऱ्यांनो सावधान…चहा पावडरमध्ये भेसळ करणारे रॅकेट उद्ध्वस्थ ; मुंबई पोलिसांची कारवाई
राष्ट्रवादी आमदाराच्या गाडीला अपघात, बस व कारमध्ये धडक
राज्याच्या सत्तेत सहभागी एका मोठ्या पक्षाला विषयी बोलताना गिरीश महाजनांनी थोडा तरी विचार करावा, महाजन यांनी पदाला शोभेल असं काम करावं आणि जिल्ह्यात भाजप पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.