मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे.या अपघातातून आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहेत. एसटी बस आणि आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये हा अपघात झाला आहे. धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर मित्रनगर जवळ हा भीषण अपघात झाला आहे.
या अपघातात संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास रसायनीजवळ हा अपघात झाला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. तीन गाड्या एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातात दोन गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी झाले आहेत.
हे पण वाचा :
सुवर्णसंधी..भारतीय सैन्यात 10वी पास उमेदवारांसाठी भरतीची मोठी घोषणा
रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट ; रेल्वेचा हा नवा नियम वाचा एकदा…
चहा पिणाऱ्यांनो सावधान…चहा पावडरमध्ये भेसळ करणारे रॅकेट उद्ध्वस्थ ; मुंबई पोलिसांची कारवाई
धुळे जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ट्रक, अॅपे रिक्षा आणि क्रूझर गाड्या एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षा आणि क्रूझर गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.