जळगाव ;- शहर मतदार संघाला विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी जनसेवेचा वारसा लाभलेले राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी विकासाचा ध्यास घेतला आहे. याचा प्रत्यय त्यांच्या सुरू असलेल्या “झंझावाती” प्रचार दौऱ्यातून दिसून येत आहे.
जळगाव शहर मतदार संघातील शनीपेठ, काट्याफाईल, गुरुनानक नगरसह परिसरात आज प्रचार रॅली काढण्यात आली.
राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे तरुण व तडफदार उमेदवार अभिषेक पाटील यांचे प्रत्येक कॉलनी, नगर, परिसरात तरुणांकडून यांचे स्वागत केले जात आहे.यावेळी गफ्फार मलिक ,नामदेव चौधरी , लीलाधर तायडे , संदीप पाटील, राजेश पाटील, गणेश सोनवणे, कल्पना पाटील ,मीनल पाटील, मंगला पाटील , ममता सोनवणे, तुषार इंगळे, सोपान पाटील, कमल ताई पाटील, रोहन सोनवणे , अमोल पाटील,मझर पठाण , रहीम तडवी, कौसर काकर , व कार्यकर्ते उपस्थित होते.