मुंबई : बँकांना मे महिन्यात एकूण 11 सुट्ट्या मिळालेल्या आहेत. हे लक्षात ठेवा कि, येत्या शनिवारपासून बँका 3 दिवस बंद राहणार आहेत. आता जवळपास अर्धा महिना उलटून गेलेला आहे.
बुद्ध पौर्णिमेची सुट्टी असल्याने 16 मे रोजी भारतातील अनेक भागांमध्ये बँका बंद राहणार (Bank Holidays) आहेत. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. त्यामुळे 14 मे आणि 15 मे रोजी बँका बंद राहतील. RBI च्या वेबसाईटवर दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांचे डिटेल्स दिले जातात.
हे पण वाचा :
गुप्तांगावर दगड मारल्याने उच्च शिक्षित तरुणाचा मृत्यू, ९ महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
MPSC मार्फत 161 जागांसाठी भरती, अधिकारी होण्याची संधी..
सुवर्णसंधी..भारतीय सैन्यात 10वी पास उमेदवारांसाठी भरतीची मोठी घोषणा
मुक्ताईनगर तालुक्यात भीषण अपघात पाच जण जागीच ठार
शरद पवार यांना धमकीच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ, वाचा काय आहे?
या महिन्यातील एकूण 11 सुट्ट्यांपैकी 5 सुट्या (Bank Holidays) याआधीच देण्यात आल्या आहेत. यामध्ये 1 मे (रविवार), 2 मे (ईद-उल-फित्र), 3 मे (भगवान श्री परशुराम जयंती/रमजान-ईद (ईद-उल-फित्र)/बसव जयंती/अक्षय तृतीया), 8 मे (रविवार) आणि 9 मे (रवींद्रनाथ टागोर जयंती) यांचा समावेश आहे. आता आणखी 6 सुट्ट्या बाकी आहेत. 14 ते 16 मे या सलग तीन सुट्ट्यांनंतर 22 मे हा रविवार आहे. त्यानंतर 28 आणि 29 रोजी अनुक्रमे चौथा शनिवार आणि रविवारची सुट्टी असेल.