मुंबई: एम आय एम चे नेते अकबर उद्दीन ओवेसी यांनी काल औरंगाबादेत. औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकला. त्यामुळे राज्याभरातून याचे तिव्रर प्रतीसाद उमटत आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी याच मुद्द्यावरून ओवेसींना घेरले आहे.
नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून अकबरुद्दीन ओवेसी याच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी “मी आव्हान करतो पोलिसांना 10 मिनिटं बाजूला करा याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर आम्ही शिवरायांचे मावळे नाही,” असे नितेश राणे यांनी म्हंटले आहे.
तसेच “या कारट्या ओवेसी ला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये “नामर्दांचे सरकार आहे” याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!!” असेही त्यांनी ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.
दरम्यान नितेश राणे यांनी माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आव्हान दिले. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना जमत नसेल तर आम्ही आमदार, खासदार, भाजपा वैगेरे नंतर आहोत, आधी मराठा, शिवप्रेमी आहोत. जर संभाजीराजे, शिवरायांचा कोणी अपमान करत असेल तर फक्त 10 मिनिटांसाठी अकबरुद्दीनला आमच्या हवाली करा. त्याला तिथेच रांगेत झोपवलं नाही तर महाराजांसमोर नतमस्तक होणार नाही,” असे राणे यांनी म्हंटले.