एरंडोल : शेतीच्या वादातून भाऊबंदकीत सुरू असलेल्या वादात एका तरुणास जमावाने बेदम मारहाण केली. गुप्तांगावर दगड मारल्याने गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उमेश आबा महाजन (वय २६, रा. मारुती मढी, एरंडोल) असे मृत तरुणाचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत कुटंुबीय रुग्णालयात थांबून होते. उमेशला मारहाण करणाऱ्या सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटंुबीयांनी घेतला आहे.
काय आहे प्रकरण?
आबा महाजन यांच्या आई सोनाबाईंच्या नावावर एरंडोल शिवारात दोन बिघे जमीन आहे. ही जमीन आबा यांच्यासह त्यांचे भाऊ सुरेश, तुकाराम व मगन असे चाैघे भाऊ प्रत्येकी एक वर्ष कसतात. जमीन कसणारा भाऊ येणाऱ्या उत्पन्नातून आई सोनाबाई यांना १५ हजार रुपये देतो. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून ही जमीन सुरेश, तुकाराम व मगन यांचे कुटंुबीय कसते आहे. आबा महाजन यांचा मुलगा उमेश हा याचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी सकाळी शेतात गेला.
हे पण वाचा :
MPSC मार्फत 161 जागांसाठी भरती, अधिकारी होण्याची संधी..
सुवर्णसंधी..भारतीय सैन्यात 10वी पास उमेदवारांसाठी भरतीची मोठी घोषणा
मुक्ताईनगर तालुक्यात भीषण अपघात पाच जण जागीच ठार
मित्रच निघाले मारेकरी, जळगावातील त्या हत्येचा CCTV मुळे उकललं गूढ
शरद पवार यांना धमकीच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ, वाचा काय आहे?
या वेळी संतापलेल्या सुरेश, तुकाराम, मगन, मनोज, उषा महाजन यांच्यासह इतरांनी उमेशवर हल्ला चढवला. दगड, काठ्या, लाथा-बुक्क्यांनी त्याला मारहाण केली. उमेशच्या गुप्तांगावर अनेकवेळा दगड मारल्याने तो बेशुद्ध पडला होता. कुटंुबीयांनी त्याला एरंडोलच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. अंतर्गत रक्तस्राव, डोक्यास जबर दुखापत झालेली असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. उपचार सुरू असताना दुपारी चार वाजता उमेशचा मृत्यू झाला.
दरम्यान, उमेशचे अभियांत्रिकीचे शिक्षण पुण्यात झाले होते. तो सध्या औरंगाबाद येथे खासगी कंपनीत नोकरीला होता. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सुटी घेऊन तो गावी आला होता. नऊ महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले असून, पत्नी मयूरी ही गर्भवती आहे. या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.