पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या एका मैदानावर आज सकाळी बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण पुणे रेल्वे स्थानक रिकामे केले होते. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने शोध घेऊन जिलेटिनच्या तीन कांड्या ताब्यात घेतले आहेत.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी येथे दाखल झाले आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) धाव घेऊन पाहणी केली. अद्याप ही स्फोटके कोणी ठेवली याची माहिती मिळू शकलेली नाही. बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हे पण वाचा :
MPSC मार्फत 161 जागांसाठी भरती, अधिकारी होण्याची संधी..
सुवर्णसंधी..भारतीय सैन्यात 10वी पास उमेदवारांसाठी भरतीची मोठी घोषणा
मुक्ताईनगर तालुक्यात भीषण अपघात पाच जण जागीच ठार
मित्रच निघाले मारेकरी, जळगावातील त्या हत्येचा CCTV मुळे उकललं गूढ
शरद पवार यांना धमकीच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ, वाचा काय आहे?
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एक वर बॉम्ब सदृश्य संशयित वस्तू दिसून आली होती. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. लगेच बंडगार्डन पोलिसांनी धाव घेतली. त्यापाठोपाठ बिडीडीएसही श्वान घेऊन दाखल झाले. तपासणी केल्यानंतर 3 जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या. त्यानुसार बिडीडीएस आणि बंडगार्डन पोलिसांनी त्या ताब्यात घेऊन जवळच्या एका मैदानात नेल्या. तेथे तो बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.