महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा परीक्षा (MPSC SSE) 2022 साठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. MPSC SSE 2022 ची प्राथमिक परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. उमेदवार आज 12 मे ते 1 जून 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या mpsc.gov.in या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करता येतील.
MPSC SSE 2022 अंतर्गत एकूण 161 जागा रिक्त आहेत. यामध्ये सहायक संचालक, मुख्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, उपव्यवस्थापक, विभाग अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि प्रमाणित शाळा निरीक्षक या पदांचा समावेश आहे.
रिक्त जागा तपशील
सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा गट अ – 9 पदे
मुख्य अधिकारी, नगरपालिका/परिषद गट अ – २२ पदे
बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट अ – २८ पदे
सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क गट ब – 2 पदे
उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट ब – 3 पदे
विभाग अधिकारी, गट ब – 5 पदे
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट ब – 4 पदे
निरीक्षक प्रमाणित शाळा – 88 पदे
पात्रता
उमेदवारांनी B.Com किंवा CA/ICW किंवा MBA सारख्या संबंधित विषयात बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :
वय श्रेणी
०१ सप्टेंबर २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]
परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्र.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा