मुंबई : लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून येत आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. अवघ्या आठवडाभरात सोन्याचा भाव 1500 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला आहे, तर सोन्याचा दर 3 महिन्यांतील नीचांकी पातळीवर आहे.
आज सोन्याचांदीचा भाव
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 24-कॅरेट शुद्धतेचे सोने 0.03 टक्क्यांनी घसरून 50,158 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले. तर वृत्त लिहिपर्यंत सोन्याचा भाव ०.०७ टक्क्यांनी घसरला होता. सकाळी बाजार उघडल्यानंतर सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली असली तरी त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली.
दुसरीकडे, आज चांदीमध्येही उसळी आहे. आज सकाळी एमसीएक्सवर चांदीचा भाव 0.3 टक्क्यांनी वाढून 58,920 रुपये प्रति किलोवर होता. मात्र, त्यानंतरच्या सत्रात चांदी ३५९ रुपयांच्या वाढीसह ५९,११० वर व्यवहार करत होती.
हे पण वाचा :
सुवर्णसंधी..भारतीय सैन्यात 10वी पास उमेदवारांसाठी भरतीची मोठी घोषणा
मुक्ताईनगर तालुक्यात भीषण अपघात पाच जण जागीच ठार
मित्रच निघाले मारेकरी, जळगावातील त्या हत्येचा CCTV मुळे उकललं गूढ
शरद पवार यांना धमकीच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ, वाचा काय आहे?
अखेर संभाजीराजेंची मोठी घोषणा, निवडणुकीबाबत म्हणाले..
जागतिक बाजारातही घसरण
जागतिक बाजारातही सोन्याच्या किमतीत घसरण होण्याचे वातावरण आहे. जागतिक बाजारात सोने तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. वास्तविक, सध्या डॉलरची ताकद चांगली आहे, त्यामुळे सोन्याच्या किमतीत मंदी आहे. सोन्याचा भाव सध्या 0.1 टक्क्यांनी घसरून $1,820.54 प्रति औंसवर आहे, तर चांदीचा भाव 0.5 टक्क्यांनी घसरून $20.76 प्रति औंस झाला आहे. म्हणजेच जागतिक बाजारातही धातूंच्या किमतीत घसरण दिसून येत आहे.