नवी दिल्ली : मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे दर एका विशिष्ट पातळीवरून वरखाली होत असताना दिसत आहे. दरम्यान, जागतिक बाजारपेठेत सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत असून आज गुरुवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला. मागणी वाढल्याने सोने महाग झाले आहे, तर चांदीच्या दरात मात्र घट झाली आहे.
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत 25 रुपयांनी वाढून 50,847 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. याआधी सोन्याचा व्यवहार ५०,९३९ रुपयांच्या पातळीवर सुरू झाला होता, पण कमी खरेदी आणि मागणीमुळे लवकरच त्याची किंमत ०.०५ टक्क्यांनी वाढून ५०,८४८ वर पोहोचली.
चांदीचे भाव घसरले
एमसीएक्सवर आज सकाळी सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात घसरण दिसून आली. सकाळच्या व्यवहारात चांदीचा भाव 351 रुपयांनी घसरून 60,401 रुपये प्रति किलो झाला. तत्पूर्वी, चांदीचा व्यवहार 60,550 रुपये प्रति किलोच्या पातळीवर सुरू होता, परंतु लवकरच तो 0.58 टक्क्यांनी घसरून 60,401 च्या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात तेजी
जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज सकाळी अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.2 टक्क्यांनी वाढून $1,855.11 प्रति औंस झाली, तर चांदीची स्पॉट किंमत 0.1 टक्क्यांनी वाढून $21.57 प्रति औंस झाली. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याच्या किमतीत सुमारे 1 टक्क्यांनी वाढ झाली होती. जागतिक बाजारात प्लॅटिनमची किंमत ०.२ टक्क्यांनी कमी होऊन ९९०.६४ डॉलर प्रति औंस झाली आहे.
हे पण वाचा :
अरे वा! आता डेबिट-क्रेडिट कार्डशिवाय काढता येणार कॅश, कसे जाणून घ्या?
जगाची डोकेदुखी वाढणार ! ‘झिरो कोविड केस’चा दावा करणाऱ्या देशात पहिल्यांदाच लॉकडाऊन लागू
12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती
खळबळजनक ! शेतकऱ्याने आधी ऊस पेटवला नंतर घेतला गळफास
रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारने केली मोठी घोषणा, लवकरात लवकर लाभ घ्या
त्यामुळे भावात येणारे चढ-उतार
अमेरिकेने बुधवारी संध्याकाळी उशिरा महागाईची आकडेवारी जाहीर केली, जी एप्रिलमध्ये 8.3 टक्के होती. ऑगस्ट 2021 पासून महागाईचा हा नीचांकी स्तर असला तरी तो अर्थतज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा खूपच जास्त आहे. महागाईचा स्तर वाढलेला पाहून गुंतवणूकदारांना भीती वाटू लागली आहे की फेड व्याजदर आणखी वाढवू शकते. या भीतीमुळे गुंतवणूकदार आपला पैसा बाजारातून काढून सोन्यात गुंतवत आहेत, कारण पिवळा धातू गुंतवणुकीसाठी हेव्हन अॅसेट मानला जातो.
याआधी, फेड रिझर्व्हने मे महिन्याच्या सुरुवातीलाच व्याजदर 0.50 टक्क्यांनी वाढवले होते. यासोबतच भविष्यात आणखी वाढ करण्याचे संकेतही देण्यात आले. अमेरिकेच्या २२ वर्षांच्या इतिहासातील व्याजदरातील ही सर्वाधिक वाढ आहे.