पाचोरा : येथील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ युवासेनेच्या युवानेते सुमित किशोर आप्पा पाटील यांनी आज आसनखेडा खु ,आसनखेडा बु , माहिजी या भागाचा दौरा करीत आप्पा यांना पुन्हा विजयी कराव्याचे आवाहन केले.
या प्रचार दौऱ्यात त्यांनी आपल्या छोटे खानी सभेत संबोधित करतांना जनतेशी असलेले चांगले वर्तन हेच महत्वाचे असल्याचे सांगत परिवर्तनाची भाषा करणाऱ्या विरॊधकांचा चांगलाच समाचार घेतला. मागच्या काळात ५ वर्ष सत्तेत असणारे राष्ट्रवादीच्या आमदारांचे वर्तन काय होते हे जनतेचे अनुभवले असून चुकीचे वर्तन करणारेच आज परिवर्तनाची भाषा करीत असल्याची त्यांनी खिल्ली उडवली. त्याच बरोबर उपटसंभू अपक्षाच्या नांदी लागून नका असे आवाहन करीत कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले. त्यांचा या प्रचार दौऱ्यास जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असून या दौऱ्यात त्यांचे सोबत जि.प.सदस्य पदमसिंग पाटील, भाजपा चे सभापती बन्सीलाल पाटील, एकलव्य संघटना चे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ, मा.जि.प.सदस्य राजेंद्र पाटील, गणेश वाघ, पंढरीनाथ पाटील,डॉ. हेमराज पाटील, युवासेनेचे जितू पाटील, युवासेने शहरप्रमुख संदीपराजे पाटील,भागवत पाटील,समाधान पाटील, कैलास पाटील, अवि पाटील, रोहित पाटील,युवराज काळे,सागर पाटील, विनोद आप्पा पाटील, अक्षय जैन, संदीप पाटील ग्रामस्थ,शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.