ब्रॉडकास्ट इंजीनिअरिंग कन्सल्टेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये (BECIL) 86 डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती होणार आहे. पदवी पास असलेल्या तरुणांना ही सुवर्णसंधी असणार आहे. इच्छुक उमेदवार22 मे पर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.becil.com वर जाऊन अर्ज करू शकतात.
रिक्त जागा
या भरती अंतर्गत, बेसिलमधील डेटा एंट्री ऑपरेटरच्या 86 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. तसेच, त्याला टायपिंगचे ज्ञान असावे, किमान वेग इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट असावा.
हे पण वाचा :
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
बँकेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, या बँकेत 690 हून अधिक जागा रिक्त, लवकरच अर्ज करा
भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 पदांची बंपर भरती, ग्रॅज्युएट पाससाठी सुवर्णसंधी..
भाजप नेत्याची राज ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले ‘हे तर उंदीर आहे’ ;
अर्जाचे शुल्क इतके द्यावे लागेल
एससी/एसटी आणि ईडब्ल्यूएस/पीएच उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 450 रुपये ठेवण्यात आले आहे. तर सामान्य, ओबीसी, माजी सैनिक आणि महिलांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये आहे.
असा करा अर्ज…
– सर्वात आधी उमेदवार बेसिलची वेबसाइट www.becil.com वर जा.
– आता होमपेजवरील ‘करिअर्स’ सेक्शनवर क्लिक करा.
– त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक करा.
– आता सर्व आवश्यक डिटेल्स भरा.
– त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
– आता उमेदवाराला अर्ज फी भरावी लागेल.
– त्यानंतर अर्ज सबमिट करावा लागेल.
– तसेच, उमेदवारांना त्यांची स्कॅन केलेली कागदपत्रे शेवटच्या पेजवर दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवावी लागतील.