माझ्या पाचोराच्या तमाम नागरिकांना जय महाराष्ट्र !
पाचोरा शहरातील माता भगिनी बंधू वडीलधाऱ्या
मंडळींना माझा साष्टांग नमस्कार..
येत्या 21 ऑक्टोंबर ला महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपल्या सर्वांना मतदान करावयाचे आहे. त्यानिमित्ताने मी आपल्याशी संवाद साधणार आहे.
नागरिकांनो गेल्या अडीच ते पावणेतीन वर्षाच्या कार्यकाळात मध्ये मी नगराध्यक्ष म्हणून पाचोरा शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी जे विकास कामे या शहरांमध्ये भी करू शकलो त्यामागे निश्चितपणे पाचोरा तालुक्याचे आमदार आदरणीय किशोर अप्पा पाटील यांचा संपूर्ण वाटा आहे. किशोर आप्पांच्या मार्गदर्शनाचा आणि राज्य सरकारकडून त्यांनी भांडून संघर्ष करून आणलेल्या प्रचंड निधीचा जर पाठिंबा माझ्यासोबत नसता तर मी आज करीत असलेले व माझ्या कार्यकाळात मंजूर केलेले व भविष्यात उभे राहणार असलेले आधुनिक पाचोरा शहराच्या निर्मितीची पायाभरणी झाली नसती.
बापूसाहेब के.एम. पाटील, आप्पासो ओंकार वाघ, सुपडू आण्णा, तात्यासो आर. ओ पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये एक विधानसभा सदस्य म्हणून आपापल्या परीने तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न केले. त्यांचा पाऊल वाटेवर चालत किशोर आप्पानी सूक्ष्म नियोजन करून शहर आणि ग्रामीन भाग यामध्ये समन्वय साधत शहराच्या विकासाचा आराखडा आम्हा सर्व नगरसेवकांसोबत बसून तयार केला. त्या आराखड्यानुसार पाचोरा शहरातील दशकापासून अस्तित्वात असलेली व जीर्ण झालेली स्मशानभूमी जागा मुळासकट नव्याने उभी केली. ज्या वाचनालयमध्ये जाऊन पाचोरा शहरातील आपल्या भावा बहिणींनी ज्ञान, जीज्ञासा वाढवली त्या वाचनालयात जेव्हा उतरती कळा लागली तेव्हा. सदरचे वाचनालय नव्याने भव्य स्वरूपामध्ये बांधून जनतेला अर्पण केले. राजीव गांधी नावाने पाचोरा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असेलेल्या टाउन हॉलच्या परिसरामध्ये लोक स्वछता गृह म्हणून वापर करत होते. घाण आणि कचरा मानवी मलमूत्र याचा ढीग त्या टाउन हॉलच्या परिसरात कायम असल्याने परिसरामध्ये दुर्गंधी आणि रोगराई पसरली होती. मात्र किशोर आप्पांच्या विशाल दृष्टीकोनाने राजीव गांधी टाउन हॉलच्या जागेवर नगरपालिकेच्या व जनतेच्या कराचा एक रुपया देखील खर्च न करता सुमारे १० कोटी रुपयांची सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. सदर इमारत बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराकडून बी.ओ.टी. तत्वावर टाउन हॉलचा विकास करत असतांना जिनिंग परिसरात असलेल्या जीर्ण व धोकादायक झालेल्या मिनी शॉपिंग सेंटर मध्ये जीव मुठीत धरून आपला उद्योग व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांसाठी नगरपालिकेचे व नागरिकांच्या करातील एक रुपया देखील खर्च न करता दोन माजली व्यापारी संकुल उभे केले. व यातून नगरपालिकेची वर्षाला लाखो रुपये कर मिळेल व नगरपालिकेचे उत्पन्नाचे स्रोत उत्पन्न होतील अशी व्यवस्था केलेली आहे.
पाचोरा शहरातील सेंड पाणी व्यवस्था व रस्ते याच्यासाठी देखील माझ्या कार्यकाळामध्ये आम्ही नागपालिकेने न भूतो ना भविष्यती असे भुयारी गटारी व सिमेंट काँक्रिटीकरणाचे पक्के रस्ते यासारखे मोठे प्रकल्प आम्ही पूर्ण करत आहोत. एकी कडे नगरपालिकेत अल्प मतात असलेली शिवसेना विकासच्या मुद्यांवर देखील अर्थपूर्ण विरोध करणारी विरोधकांची फळी विकासाबद्दलची अनास्था आणि विरोध सहन करत पाचोरा शहरातील गरीबीतील गरिबांसाठी ते उच्च वर्गीयांसाठी कुठलाही भेदभाव न करता विरोधकांचे खोटे आरोप सहन करत टप्याटप्याने शहराचा विकास करीत आहे. माझ्या अगोदर या विधानसभेला उभे असलेले मा. दिलीपभाऊ वाघ व श्री. पंडित तात्या शिंदे यांनी नागरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. मात्र शहरविकासाच्या व शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा यांची जाण व माहिती नसल्यामुळे आजही पाचोरा शहरामध्ये विकासाच्या अनुशेष शिल्लक आहे. अल्प मतात असून देखील माननीय किशोर आप्पांच्या खंबीर पाठबळामुळे मी व माझ्या नगसेवक सहकार्यांनी विकासाची हि भगीरथ गंगा शहरामध्ये उतरवू शकलो.
माझ्या या निमित्ताने शहरवासीयांना सविनय पूर्वक निवेदन आहे कि, पाचोरा शहराच्या अजूनही खूप साऱ्या समस्या आहेत. ज्या ५ वर्षाच्या कार्यकाळात प्राधान्यायें किशोर आप्पानी हाती घेतले. हि टप्याटप्याने नियोजन पूर्वक त्या पूर्ण करत आलो आहोत. राहिलेल्या प्रकल्पाना पूर्ण करण्यासाटी आपल्या पाठीमागे किशोर आप्पांच्या हात असाच कायम राहणे त्यासाठी गरजेचे आहे. किशोर आप्पा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा मतांचा जोगवा मागण्यासाठी आले आहेत. मागील ५ वर्षाच्या कार्यकाळामध्ये हाती घेतलेली विकास कामे पुढील ५ वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्णत्वास नेऊन शहराला आधुनिकतेची आणि सर्व सोयीनी युक्त असलेली व्यवस्था आपल्या सगळ्यांना निर्माण करायची आहे. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना आदरणीय किशोर आप्पांना येत्या २१ तारखेला शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून विधानसभेत आमदार म्हणून पाठवायचे आहे. आपल्या सगळ्यांचा एकमुखी व एकनिश्चयी विचाराशिवाय हे शक्य होणार नाही. विरोधकांनी माझ्या कार्यकाळामधें सभागृहामध्ये गोंधळ घालून विकासकामांना विरोध केला मात्र रस्त्यावर तुमच्यासमोर बोलतांना मात्र विकास कामे नगरपालिका करत नाही असे खोटे आरोप केलेत. माझ्या कार्यकाळामध्ये कायम नागरिक व नगरपालिका यांच्यामध्ये एक भिंत म्हणून उभे राहिले त्या सगळ्या विरोधकांनी त्यांच्या त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात खरोखर विकास कामे केली असती तर ६० वर्षांपासून आज पर्यंत पिनाच्या पाण्यासाठीची जि जीवघेणी धडपड तुम्हा आम्हाला करावी लागली नसती. त्यांनी केलेली पाप पुसायला व पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करायला आम्ही जे शिवधनुष्य हाती उचलले आहे. त्याला तुमच्या सगळ्याचे आशीर्वाद किशोर आप्पांना मतदानाच्या रुपणे हवे आहेत. मी तुम्हाला वाचन देतो की, माझा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदर विरोधकांनी कितीही विरोध केला तरीही मी तुम्हाला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देईल. त्यासाठी तुम्ही किशोर आप्पाना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवाल इतकीच अपेक्षा आणि मागणी मी तुमच्याकडे ठेवतो.
जय हिंद जय महाराष्ट्र !