मुंबई : राज्यातील काही भागात वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहे. येत्या काही दिवसात उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 13 मे रोजी पावसाचा अंदाज पुणे हवामान खात्याने वर्तवला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्येही 13 मेपर्यंत पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या पावसामुळे उन्हाने, उकाड्याने हैराण झालेल्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र पिकांना हा पाऊस नुकसानकारक ठरण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हे पण वाचा :
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज : वेतन फरकाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता मिळणार
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
लाच भोवली ! ११ हजाराची लाच घेतांना ग्रामविकास अधिकारी जाळ्यात
बँकेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, या बँकेत 690 हून अधिक जागा रिक्त, लवकरच अर्ज करा
भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 पदांची बंपर भरती, ग्रॅज्युएट पाससाठी सुवर्णसंधी..
दरम्यान, दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर ‘असनी’ चक्रीवादळ तयार झाले. हे चक्रीवादळ 10 मे म्हणजेच आज संध्याकाळपर्यंत वायव्येकडे सरकत राहण्याची दाट शक्यता आहे आणि उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीपासून पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर ओडिशाच्या किनारपट्टीपासून उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागराकडे ते जाईल, असे आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.