राज्यभरातील यशस्वी उद्योजकांची उपस्थिती
जळगाव | जळगाव येथे दि. १५ मे रोजी माळी समाजाचा राज्यस्तरीय उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील कांताई सभागृह येथे ठीक 10 वाजता कार्यक्रमाला सुरवात होईल.यावेळी राज्यभरातील यशस्वी उद्योजकांची उपस्थिती लाभणार आहे.तर उद्योजक मेळाव्यात समाजभूषण, स्मार्ट उद्योजक, युवा उद्योजक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे.
माळी साम्राज्य व समता विचार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे राज्यस्तरीय उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याला राज्यभरातील यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन लागणार आहे.
2019 मध्ये झालेल्या मेळाव्यात अनेक तरुण प्रभावित होऊन उद्योग व्यवसाय कडे वळले आहेत.
यावर्षीच्या मेळाव्यात देखील मोठ्या संख्येने तरुण उपस्थित राहतील व यावर्षी देखील अनेक तरुण नोकरीच्या शोधात बेरोजगार होता मात्र आता उद्योग व्यवसाय सुरू करून स्वयम रोजगार उभारून उद्योजक होतील असा आशावाद आयोजकांनी व्यक्त केला आहे.
सदर मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथील नगरसेवक तथा उद्योजक अविनाश ठाकरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जळगावची उद्योजक मुरलीधर महाजन तर कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील जळगाव जनता बँकेचे राजेश महाजन नाशिक येथील उद्योजक कमलाकर चौधरी यासह यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. आलेल्या सर्व समाजबांधवांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.