मुंबई- गेल्या काही महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना पक्ष व नेत्यांना चांगलंच लक्ष केल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान येत्या 14 तारखेला शिवसेनेची मुंबईत विराट सभा होणार आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेपूर्वीच शिवसेनेने एक दणदणीत टीझर सोशल मीडियावर लॉन्च केला आहे. त्यामुळे शिवसेनेची सभा दणदणीत होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
शिवसंपर्क अभियान..
दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता
स्थळ : बीकेसी मैदान, मुंबई pic.twitter.com/WJG687Equn— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 8, 2022
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात सलग तीन सभा घेऊन राज्यातील वातावरण ढवळून काढत भोंग्यांचा मुद्दा हातात घेऊन राज ठाकरे यांनी आपली प्रखर हिंदुत्ववादी अशी प्रतिमा निर्माण करून शिवसेनेला एक प्रकारे शह दिला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीलाही त्यांनी डिवचले आहे. शरद पवार हे जातीयवादी असल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रवादीला लक्ष केलं आहे.
या आठवड्याच्या 14 मे रोजी शिवसेना मुंबईत विराट सभा घेत आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेपूर्वीच शिवसेनेने एक दणदणीत आणि खणखणीत टीझर लॉन्च केल्याने सभा चर्चेत आली आहे. तर टीझर पाहुण शिवसेनेची सभा दणदणीत होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.सभेतून उद्धव ठाकरे कुणाचा समाचार घेतात याची उत्सुकता आहे.