मुंबई (प्रतिनिधी)- रेल्वे प्रवसा दरम्यान एका २० वर्षीय तरूणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मुंबईमध्ये घडली असून आज दिनांक 8 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना डहाणू रोड आरएस येथे स्वराज्य एक्सप्रेसमध्ये घडली. यावेळी ट्रेन मध्ये एकच खळबळ उडाली.हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आसपासच्या प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनला दिली.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी घेतली धाव…
प्रवाशांनी घटनेची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर तात्काळ घटनास्थळी रेल्वे कर्मचारी यांनी धाव घेतली. कर्मचाऱ्यांनी संबंधित कोचचा दरवाज उघडला असता, २० वर्षीय तरूणी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.रेल्वे मुंबईतील वांद्रे टर्मिनस ते जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णो देवी कटरा पर्यंत जाणार होती.
मृत तरुणीचं नावं आरती कुमार….
या गाडीला डहाणू रोड स्थानकात दुपारी १ वाजून १० मिनिटांनी विशेष थांबा देण्यात आला. याठिकाणी तरुणीचा मृतदेह उतरवण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने दिली. आरती कुमार असे मृत तरुणीचे नाव असून ती बिहार मधील रहिवाशी असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते सुमित ठाकूर यांनी दिली.
टॉयलेट मध्ये आढळला मृतदेह…
मृत तरूणी आरतीचा मृतदेह टॉयलेटमध्ये आढळल्यानंतर प्रवाशांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला कळवले. त्यानंतर डहाणू रोड स्थानकात ही रेल्वे थांबवण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. या तरूणीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.